काराडच्या दुसऱ्या पत्नी म्हणून ज्या महिलेचा उल्लेख केला जातो, त्या महिलेच्या नावावर आता बारशीत सुद्धा 36 एकर बागायती शेती असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे इथल्या स्थानिकांच्या माहितीनुसार जमीन खरेदी केल्यापासून जमिनीचे मालक इथे फिरकले सुद्धा नाहीयेत.
सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मीक कराड यांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतेय. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांची संपत्ती पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील शेंद्री या ठिकाणी त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती जाधव यांच्या नावावरती तब्बल जवळपास 36 एकर क्षेत्र असल्याचे पाहायला मिळते. वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या नवीन नवीन कारनामांची मालिका सुरुच आहे. दाव्यानूसार, कराडच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्री भागातील कराडनं 36 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होतोय. ही संपूर्ण जमीन बागायती आहे. बागांमध्ये मोसंबी, हरभरा, लिंबूची लागवड झाली आहे. इथे काम करणाऱ्या लोकांचे तीन महिन्यांपासून पगार थकले आहेत. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ज्यांच्या नावावर ही जमीन आहे, त्या ज्योती जाधव इथल्या लोकांच्या माहितीनुसार जमीन खरेदी केल्यापासून कधी फिरकल्या सुद्धा नाहीयेत. या जमिनीचा बाजारभाव दीड कोटींच्या घरात आहे. ज्योती जाधव नावाच्या महिलेची कराड फरार असताना सीआयडीने चौकशी केली होती. तेव्हा संबंधित महिला कराडची दुसरी पत्नी असल्याचं सांगितलं गेलं. नंतर अनेक कागदपत्रांद्वारे याच महिलेची विविध शहरांमधून संपत्ती समोर आली. मात्र अद्यापही संबंधित महिलेनं माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली नाही.
दुसऱ्या पत्नीच्या नावावर आतापर्यंत काय?
फर्ग्युसन रस्त्यावर बिझनेस टॉवरमध्ये ऑफिस, हडपसरच्या अमोनोरा टॉवरमध्ये फ्लॅट, पुण्यातल्या खराडीतही ज्योती जाधवच्या नावावर फ्लॅट त्यानंतर आता बारशीतील शेंद्रीत 36 एकर बागायती जमीनही ज्योती जाधवच्या नावाने निघाली आहे.
Published on: Jan 19, 2025 11:34 AM