रिसोड (Washim) :- वाशीम लघु पाटबंधारे (Irrigation) अंतर्गत कुऱ्हा मांडवा धरणावरील एकूण सहा डि पी आहे. त्यापैकी धरणाच्या भिंतीच्या बाजूला बद्रीनारायण घुगे यांच्या शेतातील रोहित मागील दहा दिवसांपासून जळाले असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे
शेतातील रोहित मागील दहा दिवसांपासून जळाल्याने पिकांचे नुकसान
धरणावरील शेतकऱ्यांनी जलसाठा असल्यामुळे गहू बाजरी हरभरा तुर हिवाळी भुईमूग व उन्हाळी भुईमूग कांदा लसूण हळद पिकाची लागवड केली असुन या पिकांची रोहीत्र जळाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे देयाचे मोठं संकट समोर आले आहे. स्थानिक आमदार पदाधिकारी हातांवर हात ठेवून बसले आहे. शेतकऱ्याकडे संबंधित विभाग वीज महावितरण कंपनी लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे वीज पुरवठाभावी शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जमिनीचे तापमान वाढल्याने पिके करपून जात आहे. याची नुकसानभरपाई जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी केला आहे.
लवकरात लवकर डी पी (रोहित) बसुन विज पुरवठा सुरळीत करावा अशी मांडवा येथील मांडवा धरण पाणीपुरवठा समिती अध्यक्ष शेतकरी ज्ञानेश्वर बदू राठोड़ यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे