पाकिस्तान क्रिकेट टीमने झिंबाब्वेवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय संपादित केला आहे. झिंबाब्वेने पाकिस्तानला 146 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान अवघ्या 18.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पाकिस्तानने 148 धावा केल्या. पाकिस्तानचा 22 वर्षीय सॅम अय्युब हा विजयाचा हिरो ठरला. सॅम अय्युब याने नाबाद 113 धावांची खेळी केली. सॅमने या शतकी खेळीसह इतिहास घडवला. सॅम पाकिस्तानसाठी अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज ठरला. सॅमने नक्की काय केलं? जाणून घेऊयात.
सॅम पाकिस्तानसाठी वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानसाठी वेगवान शतकाचा विक्रम हा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदी याच्या नावावर आहे. सॅमने 17 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. सॅमच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. सॅमने 190.57 च्या स्ट्राईक रेटने 3 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. इतकंच नाबी, तर सॅम पाकिस्तानला विजयी करुन नाबाद परतला. सॅमने 62 बॉलमध्ये 17 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 113 रन्स केल्या.
पाकिस्तानसाठी वनडेतील वेगवान शतकं ठोकणारे फलंदाज
शाहिद अफ्रिदी : 37 चेंडू
शाहिद अफ्रिदी : 45 चेंडू
शाहिद अफ्रिदी : 53 चेंडू
सॅम अय्युब : 53 चेंडू
सॅमकडून शाहिद अफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी
Maiden ODI period for Saim Ayub disconnected conscionable 53 balls! ⭐️👏🏽
This is the fastest ODI period by a Pakistani not named Shahid Afridi. 🔥
37 balls – Shahid Afridi 45 balls – Shahid Afridi 53 balls – Shahid Afridi 53 balls – Saim Ayub#ZIMvPAK | #PakistanCricket pic.twitter.com/vrVPHUXyCq
— Grassroots Cricket (@grassrootscric) November 26, 2024
झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन : क्रेग एर्विन (कर्णधार), जॉयलॉर्ड गुम्बी, तदिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, ब्रायन बेनेट, ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी आणि ट्रेव्हर ग्वांडू.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकीपर) सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, आगा सलमान, तय्यब ताहिर, इरफान खान, आमेर जमाल, हरिस रौफ, फैसल अक्रम आणि अबरार अहमद.