ऑनलाइन सेवेच्या जमान्यात आपण सर्वांनी वारंवार विचित्र किस्से पाहिलेत आहेत. हे किस्से सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता जरा विचार करा, तुम्ही एका दुकानातून चहा मागवला आणि त्यात साखर नाही किंवा साखर कमी आहे, तर तुम्ही त्या दुकानदाराला तक्रार करणार. त्यानंतर तो दुकानदार तुमच्या चहामध्ये साखर घालेल, बरोबर. का चहा वाला तुम्हाला असं सांगेल का साखर नाहीये तर तुम्ही चहाचे पैसे कमी द्या? दरम्यान असाच काहीसा प्रकार बेंगळुरूमध्ये घडला आहे. जेव्हा बेंगळुरूच्या एका युट्यूबरने झोमॅटोकडून चहा मागवला, पण त्याच्या चहामध्ये साखर नव्हती. या युट्यूबर ग्राहकाने चहामध्ये साखर नाहीये तर मी हा चहा पिऊ शकत नसल्याची तक्रार कंपनीला केली. मात्र या तक्रारींचे निरसन करताना कंपनीने जे केले ते पाहून तुम्ही डोक्याला हात माराल आणि म्हणाल असं कोणी करत का? आता या युट्यूबरने झोमॅटोसोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यावर सोशल मीडिया युजर्स प्रतिक्रिया देत आहेत.
काय आहे प्रकरण ?
बेंगळुरू मधील यूट्यूबर इशान शर्मा याचा सोबत हा किस्सा घडलेला आहे. दरम्यान या यूट्यूबर इशान शर्माने घडलेला प्रकार एक्सवर पोस्ट करत चॅट शेअर केली आहे. प्रत्यक्षात त्याने झोमॅटोवर गुळाचा चहा मागवला होता. मात्र झोमॅटोकडून त्याला गुळशिवाय चहा देण्यात आला, यावेळी इशान शर्मा ने सांगितले की त्याने डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर गुळाची मागणी केली होती, जी दिली गेली नाही, ज्यामुळे त्याला चहा पिता आला नाही. यावेळी यूट्यूबर इशान शर्माने झोमॅटो कस्टमर सर्व्हिसशी बोलताना त्याला कधीच अपेक्षित नसलेलं उत्तर मिळालं. त्याने त्याच्या एक्स हँडलवर कस्टमर सर्व्हिसशी बोलताना एक मजेदार चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला.
यावेळी यूट्यूबर इशान शर्मा कस्टमर एक्झिक्युटिव्हला म्हणाला, “मी आता हा चहा पिऊ शकत नाही, मी काय करू?” यावर इम्रान (कस्टमर एक्झिक्युटिव्ह) यांनी लिहिले की, “सर, मी तुम्हाला चहा पिण्याची विनंती करतो, आणि जे काही गुळाचे पैसे असतील म्हणजे 6 रुपये ते मी परताव्यासाठी अर्ज करेन.” पण जेव्हा ईशान गुळाशिवाय चहा पिऊ शकत नाही, असं म्हणतो, तेव्हा इम्रानचं उत्तर खूपच मजेशीर होतं.
Zomato got pookie chat support😭 pic.twitter.com/TlDQyTBRDS
— Ishan Sharma (@Ishansharma7390) January 15, 2025
त्यानंतर इम्रानने लिहिले की,(कस्टमर एक्झिक्युटिव्ह), ‘सकाळी चहा मिळत नाही तेव्हा कसं वाटतं हे मला माहीत आहे, संपूर्ण दिवस खराब जातो, प्लीज सर, फक्त आजसाठी मी तुम्हाला विनंती करतो, मला तुम्हाला वाईट वाटू द्यायचं नाही.’ आता यूट्यूबर इशान शर्मा आणि झोमॅटो एक्झिक्युटिव्ह यांच्यातील हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.
युजर्सना ही गोष्ट खूपच मजेदार वाटत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करत आपलं मत मांडलं आहे. एका युजरने लिहिले- झोमॅटोने पर्सनल टच दिला आहे. दुसऱ्याने याने लिहिले- पुढे असे होईल की सर, आजसाठी टिक्का मसाला खा, आम्ही पनीरचे पैसे परत करू. तिसऱ्याने लिहिले – त्यांना माहित आहे की तुम्ही सिंगल आहात, म्हणून पुकी सपोर्ट तुमच्यासाठी आहे.