अद्भूत कर्तृत्वान मंडळी...

3 hours ago 2

अद्भूत कर्तृत्वान मंडळी... pudhari photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

31 Jan 2025, 1:05 am

Updated on

31 Jan 2025, 1:05 am

रातोरात सृष्टी निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवालाही भारी पडतील अशा ताकदीची माणसे आपल्या राज्यात आणि देशात आहेत याचा आपल्याला अभिमानाच वाटला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की, असे अद्भूत कर्तृत्व असणारी माणसे कोणती आहेत आणि कुठे आहेत? मंडळी असे लोक अत्रतत्र सर्वत्र आहेत.

घडले असे की, पुण्याजवळील वाघोली परिसरात नेहमी ट्रॅफिक जाम होते. प्रवाशांचा आणि वाहनांचा खोळंबा होतो. याची तक्रार काही लोकांनी पुणे पोलीस कमिशनर महोदयाकडे केली. ते स्वतः तातडीने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा लेखाजोखा घेतला. वर्षानुवर्षे आपणा सर्वांच्या लक्षात आलेली गोष्ट पोलिसांच्या पुन्हा लक्षात आली आणि रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होते असा जुनाच निष्कर्ष त्यांनी पुन्हा नव्याने काढला. बरोबर फौजफाटा भरपूर असल्यामुळे कमिशनर महोदयांनी तत्काळ अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. अतिक्रमण करणार्‍यांची एक वेगळीच परिस्थिती असते. कोणाच्याही मालकीच्या नसलेल्या जागेवर त्यांनी कुठलीही परवानगी न घेता आपले टपरीवजा हॉटेल, गॅरेज किंवा शेड टाकलेले असते. अतिक्रमण करणार्‍या लोकांची धावपळ उडाली आणि त्यांनी तत्काळ अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. बराचसा रस्ता मोकळा करून कमिशनर महोदयांनी नि:श्वास टाकला.

खरी गोष्ट इथून सुरू होते. ती म्हणजे ज्यांचे अतिक्रमण काढले आहे, ते तत्काळ येथील सामान घेऊन आजूबाजूला कुठेतरी ठेवून जातात आणि सरकारी यंत्रणांची पाठ फिरताच अवघ्या 24 तासांत ते अतिक्रमण त्या जागेवर पुन्हा नव्याने उभे राहते. यामुळेच आम्ही यांना प्रतिब—ह्मदेव असे म्हटले आहे. अस्तित्वात नसलेल्या जागेवर अतिक्रमण उभे करणे, पथक येताच अतिक्रमण काढणे आणि रातोरात ते पुन्हा उभे करून दुसर्‍या दिवशी व्यवसाय सुरू ठेवणे हे ब्रह्मदेवालाही न झेपणारे काम आहे, यात शंका नाही. अतिक्रमण करणार्‍या लोकांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने तिथे विविध वाहने उभी असतात, लोक असतात. उदाहरणार्थ एखादे गॅरेज असेल, तर त्याच्या बाजूला रस्त्यावर चार-पाच कार उभ्या असतात. या सगळ्या कार आहे त्या चिमूटभर रस्त्याचा घास घेत असतात. उरलेल्या रस्त्यामधून ट्राफिक कशीबशी चालू असते. वाहनधारकांनी आपले वाहन कसे काढायचे, असा प्रश्न उभा होतो. महाराष्ट्र राज्यात आडमुठ्या लोकांची काही कमी नाही. सगळे काही सुरळीत चालू असताना मध्येच चुकीच्या मार्गाने, नियम तोडून आपले वाहन समोर आणणारे लोक दोन्ही बाजूंच्या ट्रॅफिकचा खोळंबा करतात. वाहनांच्या रांगा लागतात आणि अवघ्या दहा मिनिटांत दोन किलोमीटरपर्यंत वाहने एका पाठोपाठ खोळंबून उभे राहतात. शेवटच्या माणसाला पुढे काय झाले आहे किंवा अधिक पुढे ट्रॅफिक का खोळंबली आहे, हे कळत नाही. तो बिचारा गाडीमधून उतरून प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन पाहतो. दोन गाडीवाले एकमेकांच्या समोर आलेले असतात आणि दोघांनाही मागे किंवा पुढे जाण्याचा मार्ग नसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article