अभियंता संघटनेच्या कोल्हापूर राज्यस्तरीय अधिवेशनात प्रलंबित प्रश्नांवर होणार चर्चा:राज्यभरातून अभियंते उपस्थित राहणार- रा. ना. कुलकर्णी
2 hours ago
2
राज्यात जिल्हा परिषदांमधून ई अंदाजपत्रक व ई मोजमाप पुस्तिका प्रणाली लागू करावी यासह इतर प्रलंबित मागण्यांवर कोल्हापूर येथील राज्यस्तरीय अधिवेशनात चर्चा होणार असून या मागण्यांसाठी वेळप्रसंगी केल्या जाणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रा. ना. कुलकर्णी यांनी दिली आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे राज्य अधिवेशन व राज्यस्तरीय सर्वसाधारण सभा ता. 2 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. यावेळी कोल्हापूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी एस. कार्तीकेयन, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतो, जोशी, कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, अर्जुन गोळे, संघटनेचे राज्याध्यक्ष सुहास धारासूकर, उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. उदय बोपशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यात अभियंत्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवीन उपविभाग निर्माण करणे, अभियंत्यांना दरमहा वेतनासोबत प्रवास भत्ता देणे, अश्वासीत प्रगती योजनेअंतर्गत एस-25 वेतन श्रेणीचा तिसरा लाभ देणे, वेतन त्रुटी समितीचा अहवाल स्विकारून तातडीने लागू करणे, राज्यातील जिल्हा परिषदांमधून ई अंदाजपत्रक व ई मोजमाप पुस्तिका प्रणाली लागू करणे यासह इतर प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्ना संदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या राज्यस्तरीय अधिवेशनात या प्रश्नांवर चर्चा करून वेळप्रसंगी आंदोलन करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून सुमारे 10 हजार पेक्षा अधिक अभियंता उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रा. ना. कुलकर्णी यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)