अमरावतीचा सर्वांगीण विकास हाच ध्यास:महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांचे प्रतिपादन
2 hours ago
1
प्रत्येकाचे समाधान होईपर्यंत शासन,प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत. असे प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार सुलभा संजय खोडके यांनी आशिर्वाद पदयात्रेत रुक्मिणी नगर, विजय कॉलनी येथे उपस्थिताना केले. मतदारसंघात सर्वाधिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहीजे, तसेच अधिकाधिक निधी उपलब्ध करून देत विकासपर्व यापुढेही अखंडित सुरू ठेवण्याचा आपला संकल्प आहे. वैचारिक बांधिलकी, नीतिमत्ता, सदैव सोबत असणाऱ्या मतदार बांधव व भगिनींचा विश्वास सार्थ ठरवीत महायुतीचे उद्दिष्ट हे प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समता मिळवून देण्याचे आहे. या शब्दांत महायुतीच्या उमेदवार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी राजेंद्र कॉलोनी, श्याम नगर येथे आशिर्वाद पदयात्रे दरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. लोकशाही व्यवस्थेत मतदान हे महत्वपूर्ण कर्तव्य आहे. आपल्या समुदायाचे भविष्य निश्चित करण्याचे सामर्थ्य मतदानामध्ये आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रमुखाने, सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहीजे. या आशिर्वाद यात्रेमध्ये मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)