गणित व इंग्रजीच्या पेपरला बैठे पथक
गणित व इंग्रजीच्या पेपरसाठी गटशिक्षणाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक असेल. सर्व तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी व इतर विभाग
प्रमुख तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी देतील. केंद्र स्तरावरही एक दक्षता पथक तयार करण्याचे आदेश आहेत. परीक्षा केंद्राच्या परीसरात कलम 144 लागू केले जाणार आहे.
‘त्या’ केंद्रांवर बाहेरील पर्यवेक्षक
मागील 5 वर्षाच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत, अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणार्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचार्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्यांमधून करण्यात येणार आहे, परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहे.
कशी असेल पथकांची रचना
एकूण सात भरारी पथके असणार आहेत. जिल्हाधिकारी, डाएटचे प्राचार्य, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, योजनेचे शिक्षणाधिकारी, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकारी यांचे, असे सात पथके असणार आहेत. प्रत्येक पथकात तीन सदस्यांचा समावेश असेल. त्यात एक महिला असणार आहे.