आधी स्वत:चे जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा:देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर, मनसे आता गुनसे झाल्याची केली टीका
2 hours ago
1
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. हे जर व्होट जिहाद करत असतील तर, आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आधी स्वत:चे जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता गुजरात नवनिर्माण सेना झाली, अशी टीका राज ठाकरेंवर केली. ते ठाण्यातील प्रचारसभेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही आमच्या प्रचार गीतात जय शिवाजी, जय भवानी बोललो, तर ते यांच्या डोळ्यात खुपते. हिंदू आमचा धर्म आहे, असे बोललो तर तेही त्यांच्या डोळ्यात खुपते, आणि हे महाशय आता धर्मयुद्ध करायला निघाले आहेत. फडणवीसांनी आधी स्वत:चे जॅकेट सांभाळावे, मग धर्मयुद्ध करावे. मनसे आता गुनसे झाली पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. आधी ती मनसे होती. आता ती गुनसे झाली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तुमचे मत जर मिंधेंना, त्यांच्या बरोबर असलेल्या भाजपला किंवा गुनसेला दिले. म्हणजे गुजरात नवनिर्माण सेनेला दिले, तर ती तुमची महाराष्ट्र द्रोह्यांना मदत होईल. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला येथील प्रचारसभेत भाषणावेळी सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ क्लिप भाषणात ऐकवली. आता यांनी व्होट जिहादचा नारा दिला आहे. व्होट जिहादचे सिपेसिलार कोण आहेत, हे तुम्ही ऐकले आहे. व्होट जिहादसाठी महाविकास आघाडीचे नेते उलेमानचे तळवे चाटत आहेत. दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ, असे ते सांगत आहेत. जर या ठिकाणी व्होट जिहाद होणार असेल, तर आता मतांचे धर्मयुद्ध आपल्याला देखील लढावे लागेल, असे ते म्हणाले. आता एक राहिलो तरच सेफ राहू असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी एक है तो सेफ है... पुनरुच्चार केला होता. ही तुमची आणि तुमच्या पुढील पिढ्यांची निवडणूक असल्याचे ते म्हणले होते. हे ही वाचा... देवेंद्र फडणवीस VS शरद पवार VS नाना पटोले:‘व्होट जिहाद’: पवारांचा ब्राह्मण समाज, पटोलेंचा संघावर निशाणा मुस्लिमांनी मविआच्याच उमेदवारांना मतदान करावे, असे ऑल इंडिया उलेमा कौन्सिलचे प्रमुख नोमाणींनी आवाहन केले. हा व्होट जिहाद असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, पुण्याच्या कसबा पेठेत एक समाज भाजपला सातत्याने मतदान करतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आरएसएसही धार्मिक संघटना आहे. ती भाजपचा प्रचार करते. त्याचे काय? पूर्ण बातमी वाचा... महाविकास आघाडीचे मनसुबे उधळणार:देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार; म्हणाले - मविआचे धर्माचा वापर करून जिंकण्याचे स्वप्न धर्माचा वापर करून महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष व्होट जिहाद करीत आहेत हे अतिशय खेदजनक आहे. पण धर्माचा वापर करून निवडणुका जिंकण्याचे महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावू असा सज्जड दम नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)