दक्षिण आयर्लंडमधील काउंटी कार्लोमध्ये एका भीषण अपघातात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. चेरकुरी सुरेश चौधरी आणि चितूरी भार्गव अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचा समावेश आहे.
चौघेही जण साउथ ईस्ट टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (SETU) कार्लो येथे शिकत असून एकाच घरात राहत होते. चौघेही कारने कार्लो शहराच्या दिशेने चालले होते. यावेळी ग्रॅगुएनस्पिडोजजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एका झाडावर आदळली. अपघात इतका भीषण होता की कारमधील दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. जखमींना सेंट ल्यूक जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.