विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून शनिवारी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जि. प., अमरावती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० किमी. सायकल रॅलीत अधिकाऱ्यांसह शेकडोंच्या संख्येत सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. आरोग्यासह मतदान जनजागृती या दोन्ही उद्देशांमुळे पहाटे ६.३० वाजता शहरवासीयांकडून रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीला सुरुवात केली. ही सायकल रॅली कलेक्टर ऑफीस, बियाणी चौक, विभागीय आयुक्त कार्यालय, कांता नगर, पंचवटी चौक, शेगाव नाका, कॉटन मार्केट रोड, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, रेल्वे पुलावरून काँग्रेसनगर रोड हमालपुरा, रुक्मिणी नगर, गर्ल्स हायस्कूल, शिवाजी नगर (राठी शाळा) या मार्गाने पुढे गेली. जिल्हा स्टेडियमवर रॅलीचा समारोप झाला. होय मी मतदान करणार या संदेशाने अंबानगरी दणाणली. या सायकल रॅलीत निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया, बिधानचंद्र चौधरी, बटुलाल गंगाधर, वेंकन्ना तेजावथ, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापात्र, डीसीपी गणेश शिंदे, सागर पाटील, मनपा आयुक्त सचिन कलंत्रेसह विविध अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. अमरावती सायकलिंग असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, संजय मेडसे, डॉ. सागर धानोरकर, अतुल कळमकर, प्रवीण जयस्वाल, विजय धुर्वे, डॉ.डफळे, औषध निर्माण संघटनेचे अमोल वारकरी, शरद मुंडे, नितीन गुप्ता यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. औषध निर्माण अधिकारी संघटनेद्वारे सर्व सहभागी सायकलस्वारांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. सायकल रॅली यशस्वितेसाठी जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, राजेश सावरकर, श्रीकांत मेश्राम, नितीन माहोरे, हेमंतकुमार यावले, विशाल विघे, प्रवीण खंडपासोळे यांचे सहकार्य लाभले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)