नारायणगाव: पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा जवळ असलेल्या भोसले पेट्रोल पंपाजवळ खासगी बस कंटेनरवर आदळल्याने अपघात झाला. या अपघातात बसमधील ३५ ते ४० प्रवासी जखमी झाले.
हा अपघात शुक्रवारी (दि. ७) पहाटे साडेपाच वाजता झाला असल्याची माहिती मिळत आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तथापि या सगळ्या प्रवाशांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची प्राथमिक समजलेली माहिती अशी की, प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस चोपड्याहून पुण्याच्या दिशेने चालली होती. भोसले पंपाजवळ रस्त्यावर असलेले गतिरोधक पास करीत असलेल्या कंटेनरवर मागून येणारी ही बस जोरदार आदळली. या अपघातात बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.