MahaShivratri 3 Lucky Zodiac 2025 : वैदिक शास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत.या 3 राशींच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत जबरदस्त फायदा होऊ शकतो.
सनातन धर्मात महाशिवरात्रीला फार महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.हिंदु पंचांगानुसार यंदा बुधवारी 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे.
1 / 5
महादेवाची उपासना करण्यासाठी महाशिवरात्री फार मोठी रात्र असते. त्यामुळेच याच दिवशी भाविक महादेवाची मनोभावे पूजा करतात. ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांनुसार, यंदाची महाशिवरात्री विशेष आहे. या दिवशी श्रवण नक्षत्र आणि परिघ योग यांचं अद्भूत संयोग होणार आहे. त्यामुळे यंदाची महाशिवरात्री 3 राशींसाठी भरभराटीची ठरु शकते. नक्की कोणत्या 3 राशींसाठी यंदाची महाशिवरात्री फायदेशीर ठरु शकते? हे जाणून घेऊयात.
2 / 5
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची महाशिवरात्र मेष राशीसाठी खास असणार आहे. या दिवशी आर्थिक स्थिती चांगली असेल. महादेवाच्या कृपेने चांगली बातमी मिळेल. व्यवसायिकांना विशेष फायदा मिळेल. वैवाहिक आयुष्यात आनंद राहिल. नोकरदार वर्गाला पगारवाढीबाबत चांगली बातमी मिळू शकते.
3 / 5
महाशिवरात्री मिथुन राशीसाठी लाभदायक समजली जाते. मिथून राशीच्या लोकांसाठी नोकरीसंदर्भात विशेष फायदा होईल. कामाच्या ठिकाणी रणनितीमुळे चर्चेत राहाल. नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळू शकते. आरोग्य उत्तम राहिल. व्यवसायिकांची प्रगती होईल. व्यवसायात लक्षणीय वाढ होईल. आर्थित गोष्टी संदर्भात कोणतीही मोठी योजना साकार होईल. विवाहितांना जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभेल.
4 / 5
महाशिवरात्रीपासून सिंह राशीची चांगली वेळ सुरु होईल. सिंह राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपादृष्टी राहिल, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावं. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते. (Disclaimer: वरील माहिती सामान्य आणि धार्मिक माहितीवर आधारित आहे. Tv9 मराठी याची पुष्टी करत नाही.)
5 / 5