एक्सक्लुझिव्ह:संभाजीनगर जिल्ह्यात 15 हजार पुरुषांचे मतदान घटले, तर महिलांचे मतदान मात्र 91 हजारांपेक्षा जास्त वाढले
11 hours ago
1
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरलेल्या "लाडकी बहीण' योजनेचा मतदानावर थेट परिणाम झाल्याचे समोर आले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा एकूण मतदानात ४% वाढ झाली असली तरी महिलांनी केलेल्या मतदानात तब्बल ११% वाढ झाली. दुसरीकडे पुरुषांच्या मतांमध्ये मात्र २ टक्क्यांची घट नोंदवली गेली. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे मतदान वाढल्याचे स्पष्ट होते. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारची हिट ठरलेली लाडकी बहीण योजना राज्यातही सुरू केली. या योजनेवर विरोधकांकडून टीका होत असतानाच निवडणुकीचा बिगुल वाजला आणि ही योजनाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरली. बुधवारी झालेल्या मतदानामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्व ९ मतदारसंघांमध्ये महिलांनी यंदा अधिक मतदान केले.
पाच मतदारसंघांत पुरुष घटले लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदानात वाढ झाली असताना दुसरीकडे मात्र ५ मतदारसंघांत पुरुष मतदारांनी २०१९ च्या तुलनेत यंदा निरुत्साह दाखवला. यामध्ये कन्नडमध्ये ८४३८, फुलंब्री-६३२०, वैजापूर-२३४८, पैठण-१६१३ तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ११०० पुरुषांनी गेल्या वेळच्या तुलनेत यंदा कमी मतदान केले. गंगापूरमध्ये सर्वाधिक वाढ २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक १७,९१३ महिला मतांचा फरक गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात दिसून आला. तर यापाठोपाठ सिल्लोड-१४,५८२, औरंगाबाद पश्चिम-१३,६०३, वैजापूर-१२,६६२, पैठण-१२,०५८, फुलंब्री-७१०९, औरंगाबाद मध्य- ६२०४, औरंगाबाद पूर्व-४४६० तर कन्नडमध्ये ३१३१ महिलांची वाढ झाली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)