११ लाख ९ हजार ८४५ मतदारांनी बजावला हक्क
जिंतूर ७५.३६, परभणी ६५.७३, गंगाखेड ७३.०४, पाथरी ७०.९७
परभणी (Parbhani Assembly Elections) : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अंतीम आकडेवारी नुसार परभणी जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्रात एकूण ७१.४५ टक्के एवढे मतदान झाले आहे. १५ लाख ५३ हजार ३६९ मतदारांपैकी ११ लाख ९ हजार ८४५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
जिंतूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७५.३६ टक्के एवढे मतदान झाले आहे. या ठिकाणी ३ लाख ८८ हजार २९४ मतदारांपैकी २ लाख ९२ हजार ६३४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी विधानसभा क्षेत्रात ६५.७३ टक्के इतके मतदान झाले. येथे ३ लाख ५० हजार ५५९ मतदारांपैकी २ लाख ३० हजार ४२४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. गंगाखेड विधानसभा मतदार क्षेत्रात ७३.०४ टक्के एवढे मतदान झाले. या ठिकाणी ४ लाख २१ हजार २७२ मतदारांपैकी ३ लाख ७ हजार ६८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाथरी विधानसभा क्षेत्रात ७०.९७ टक्के मतदानाची नोंद झाली. या (Parbhani Assembly Elections) ठिकाणी ३ लाख ९३ हजार २४४ मतदारांपैकी २ लाख ७९ हजार १०४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.