परभणीतील सेलू रेल्वेस्थानक वरील घटना
पुणे – नांदेड एक्सप्रेसला तोबा गर्दी ;
मात्र ऑन ड्युटी वरील टीटीई गायब , पोलीसही गायब
परभणी/सेलू (Assembly Elections 2024) : राज्यात बुधवार २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघात पवित्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळेल त्या वाहनातून प्रवास करून आपले गाव गाठले आहे.
यादरम्यान मतदार कोणत्या दिव्यातून मतदानाचे (Assembly Elections 2024) पवित्र कार्य पार पाडण्यासाठी आले त्यांच्या व्यथा पाहिल्या तर आश्चर्य वाटेल असेच आहे. पुण्याहून हुजूर साहेब नांदेड या पुणे -नांदेड गाडी क्रमांक १७६२९ ही गाडी नियोजित वेळेनुसार पुणे येथे १८ नोव्हेंबर रोजी ९:३५ वाजता वेळेवर निघाली तेव्हा प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर दोन गाड्यात बसतील एवढे प्रवासी होते. प्रथम सामान्य व नंतर वातानुकूलित डब्यात प्रवाशांनी ताबा घेतला. बघता बघता संपूर्ण आरक्षित डबे खचाखच भरले. पुणे- नांदेड एक्सप्रेस ने रात्री दौंड आणि मनमाड सोडले तरी वातानुकूलित भोगीत एकही टीटीई फिरकला नाही.
म्हणून या पुणे एक्सप्रेसच्या वातानुकूलित भोगीतील प्रवाशांनी रेल्वेच्या सर्व उपलब्ध सुविधावर तक्रारीचा पाऊस पाडला. पण ना टीटीई आले ना सुरक्षा बलाचे कर्मचारी. हे सुरू असताना मुंबईच्या दिशेने मनमाड पर्यंत आलेल्या मराठवाडा प्रदेशामधील प्रवाशांनी पूर्वी गर्दी झाली होती. त्याच वातानुकूलित भोगीसह स्वच्छता प्रसाधन ही प्रवाशांनी बळकावले. भोगी क्रमांक बी इ एकच्या एका प्रसाधन ग्रहात दडलेल्या प्रवाशांनी थेट पुण्यापासून सेलू पर्यंत प्रवाशांनी लाथा घातल्या तरीही उघडले नाही. पुढे संभाजीनगर स्टेशनवर प्लॅटफॉर्म वरील पोलीसांनी शिट्टी वाजविल्याने दुसर्या प्रसाधनांमध्ये दडलेल्या महिलांनी दार उघडल्याने प्रवाशांना थोडा धीर आला पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या दिव्यातून सामोरे जावे लागले.
एकंदरीत २०नोव्हेंबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा बल आणि टीटीई हे सुट्टीवरच होते का याची चौकशी व्हावी अशी संतप्त रेल्वे प्रवासी मागणी करत होते.