एजंटने शेतकऱ्यांसाेबत केलेला करारनामा ‘दिव्य मराठी’कडे:रेल्वेमार्गानजीक शेतात घर बांधून देणारे एजंट घेणार मावेजाची 70, तर शेतकऱ्यांना देणार 30% रक्कम
3 hours ago
2
पाचोरा-जामनेर रेल्वेलाइनसाठी भूसंपादन केल्या जाणाऱ्या शेतांमध्ये जास्त मावेजा मिळवून देण्यासाठी गुंतवणूकदारांच्या वतीने एजंट शेतात फळबागा लागवड आणि घरे बांधून देण्यासाठी पैसे खर्च करीत आहेत. मावेजातील ७० टक्के रक्कम एजंट घेईल. उर्वरित ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. मावेजासाठी वकिलांकडून एजंट आणि शेतकरी यांच्यात नाेटरी करारनामा केला जात आहे. ‘दिव्य मराठी’ने एका एजंटशी संपर्क साधल्यानंतर त्याने करारनामा करून घरे बांधून देणे तसेच माेबदला मिळवून देण्याची हमी दिली. दिव्य मराठी प्रतिनिधीचा एजंटसाेबत झालेला संवाद असा... प्रतिनिधी : तुम्ही रेल्वेचे काम पाहता, आमचेही शेत त्यात जाणार असल्याची नाेटीस आली आहे.
एजंट : हाे. तुमचे गाव काेणते, किती शेतकऱ्यांचे शेत जाणार आहे याची माहिती मला द्या.
प्रतिनिधी : माझे भाऊबंद आहेत, गावातील चार ते पाच जणदेखील आहेत. काय करता येईल? काही ठिकाणी फळझाडे लावली जात आहे.
एजंट : आता फळझाडे लावा, त्यांना पाणी द्या. माेजणी,सर्वेक्षण फास्ट सुरू झाले आहे. यासाठी खूप उशीर झाला आहे. आता खाेल्या बांधून काम हाेईल. लवकर करा, वेळ कमी आहे.
प्रतिनिधी : म्हणजे, काय करावे लागेल?
एजंट : ब्लाॅकचे घर बांधावे लागेल.
प्रतिनिधी : त्यासाठी किती पैसे द्यावे लागतील?
एजंट : पैसे लागणार नाहीत. तुम्ही चार-पाच शेतकरी बघा. सर्वांची एकदाच घरे बांधू देऊ. अनेक ठिकाणी ही कामे सुरू आहेत.
प्रतिनिधी : पैशाचे कसे करावे लागेल?
एजंट : आता पैसे लागणार नाहीत, पण माेबदल्याचे पैसे भेटल्यानंतर ७०%रक्कम आम्हाला द्यावी लागेल. ३०% तुम्हाला भेटतील.
प्रतिनिधी : आम्ही तयार आहाेत, परंतु इतर शेतकरी पैसे देणार नाहीत असे वाटते.
एजंट : आपण वकिलाकडे स्टॅम्पवर नाेटरी करून घेणे, दाेन चेक घेताे. कारण पैसे तुमच्या खात्यावर येणार असतात.
प्रतिनिधी : कुठे करावे लागेल नाेटरी आणि कागदपत्रे काय लागतील?
एजंट : आधार कार्ड, २ फाेटाे, बँकेचे पासबुक व दाेन चेक लागतील. तुम्ही या, सर्व रेडी आहे.
प्रतिनिधी : स्टॅम्प पाचाेऱ्याला करू का?
एजंट : काेठेही केला तरी चालेल, तुम्ही कळवा मी स्वत: येऊन जाईल. आमच्या वकिलाकडेे सर्व तयारच असते. यंत्रणेतील साखळी सांभाळण्याची हमी शेतात घरे, गाेडाऊन बांधल्यानंतर एजंट ७/१२ उताऱ्यावरील नाेंदी, मालमत्तेचे मूल्यांकन, माेजणी आणि माेबदला ही सर्व प्रशासकीय यंत्रणेतील साखळी सांभाळून घेण्याची हमी दलालाने दिली. सर्व सेटिंग पक्की असल्याचा विश्वासही दलालाने दिला. एजंटशी झालेला करार शेतकरी आणि एजंट यांच्यात झालेला हा करारनामा. एजंटला ७० टक्के माेबदला देणे मान्य असल्याचा करार १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नाेटरी करून देण्यात आला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)