करमाळा शहर विकासाचा प्रस्ताव शिवसेना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे.Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 12:48 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:48 am
करमाळा : शहर विकासासाठी देण्यात आलेल्या 21 कोटी 75 लाख रकमेच्या प्रस्तावावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कामांचे अंदाजपत्रक व ठराव निश्चित करून घ्यावेत, अशा सूचना नगर विकास खात्याला केल्या आहेत.
करमाळा शहर विकासाचा प्रस्ताव शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला. या सर्व कामाचे अंदाजपत्रक तयार करून ठराव निश्चित करून घ्यावेत असे आदेश विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई येथे नंदन बंगल्यावर जिल्हाप्रमुख चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये शहरातील सर्व बाजूने येणार्या रस्त्यांचे सुशोभीकरण करणे, रोड डिव्हाइडर करणे, श्रावण नगर, गणेश नगर, मुथा नगर, शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते, सर्वत्र नवीन स्ट्रीट लाईट, नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण, करमाळा शहर ते देवीचा माळ रोड सुशोभीकरण असा सर्व एकत्रित प्रस्ताव देण्यात आला आहे. नगर विकास मंत्री शिंदे यांनी तात्काळ यावर स्वाक्षरी करून प्रस्ताव मागून घ्या असे आदेश नगर विकास सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांना दिले आहेत.
प्रलंबित पाणीपुरवठा प्रस्तावांना गती
सुधारित पाणीपुरवठा योजना अमृत टू, जलशुद्धीकरण प्रकल्प व भुयारी गटार योजना याचा शासन दरबारी 320 कोटी रुपयांचा प्रस्ताव पडून आहे. या कामातील कागदपत्रातील त्रुटी दूर करून आवश्यक त्या जागा संपादित करून करमाळ्याचे येथील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तात्काळ उपायोजना करा अशी सूचना नगर विकास सचिवांना दिले आहेत.