Published on
:
22 Jan 2025, 12:25 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:25 am
सोलापूर : महापालिकेच्या मिळकतकराच्या थकबाकीपोटी पार्क चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सील केले आहे. ही कारवाई महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या विशेष वसुली पथकांनी मंगळवारी (दि. 21) केली. तर दक्षिण आणि उत्तर कसब्यातील सात मिळतदारांचा पाणीपुरवठा खंडित केला.
महापालिकेच्या वतीने मिळकतकराच्या थकबाकीसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. झोननिहाय कारवाई केली जात आहे. यामध्ये पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. मंगळवारी करसंकलन विभागाच्या वतीने पार्क चौकातील लालबहादूर शॉपिंग सेंटरमधील हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएमचे 88 लाख 60 हजार 296 रुपयांच्या थकबाकीपोटी सील केले.
दक्षिण आणि उत्तर कसबा परिसरातील मिळतदार विलास मंठाळकर (दोन लाख 58 हजार), विवेक दिपाळगांवकर (एक लाख 23 हजार), लक्ष्मण ताजणे (एक लाख 49 हजार) अनिल जाधव (95 हजार), चमनबाई तिवाडी (एक लाख 15 हजार), किसन मोरे (76 हजार), चंद्रभागाबाई कोकरे (एक लाख 77 हजार) या सात मिळकतदारांचा थकबाकीपोटी पाणीपुरवठा खंडित केला. महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्या आदेशाने उपायुक्त अशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करसंकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या विशेष पथकांनी ही कामगिरी केली.