Published on
:
21 Nov 2024, 11:24 am
Updated on
:
21 Nov 2024, 11:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील पुढील सरकार महाविकास आघाडीचे असेल जनतेचा कल काँग्रेसकडे असून पक्षाचे बहुतांश उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. ज्या पद्धतीने मतदानाचा ट्रेंड येत आहे, लोक ज्या पद्धतीने सांगत आहेत, त्यावरून राज्यात सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार यात शंका नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. 25 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अनेक एक्झिट पोल समोर आले आहेत. विविध यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महायुती आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. यावर नाना पटोले यांनी या एक्झिट पोलचे दावे फेटाळून लावले आहेत.