Anjali Damania connected Dhananjay Munde : बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे हे आधीच अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांचे बाड सादर करत मुंडेंवर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकंदरच धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढतच चालल्याचे दिसत आहे.
अंजली दमानिंकडून मुडेंच्या राजीनाम्याची मागणी
बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे हे आधीच अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांचे बाड सादर करत मुंडेंवर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकंदरच धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढतच चालल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी केलेल्या विविध घोटाळ्यांचे पुरावे अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सादर केले. वर्षभराच्या कालावधीत या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का, याचा मुख्यमंत्र्यांनी गंभीर विचार करावा, असे म्हणत काहीही झालं तर आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी अंजली दमनिया यांनी केली.
ही बातमी अपडेट होत आहे.