कुंभमेळ्यासाठी प्रवासखर्च झाला तिप्पट:नागपूर-प्रयागराज विमानभाडे 36 हजारांवर, रेल्वेत आरक्षण नाही; बस भाड्यातही 40 टक्के वाढ

2 hours ago 1
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवासखर्चाचा मोठा फटका बसला आहे. विमान, रेल्वे आणि बस भाड्यात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सामान्य भाविकांसाठी कुंभमेळ्याचा योग साधणे कठीण झाले आहे. नागपूर ते प्रयागराज या मार्गावर सामान्यपणे ८ ते ९ हजार रुपये असणारे विमानभाडे आता २५ ते ३९ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. २३ जानेवारीला तर थेट विमानाचे तिकीट ३६ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेषतः दर्श अमावस्या (२९ जानेवारी), माघ पौर्णिमा (१२ फेब्रुवारी) आणि महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी) या महत्त्वाच्या स्नान पर्वांच्या दिवशी विमानभाडे ४० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. रेल्वे प्रवासाची स्थिती अधिक बिकट आहे. नागपूर-प्रयागराज मार्गावरील कोणत्याही रेल्वेगाडीत आरक्षण मिळणे अशक्य झाले असून, ऑनलाइन बुकिंगसाठी 'रिग्रेट नो मोअर बुकिंग' असा संदेश येत आहे. खासगी बस वाहतुकदारांनीही संधीचा फायदा घेत भाड्यात ४०% वाढ केली आहे. नेहमी १००० ते १२०० रुपये असणारे बसभाडे आता २००० रुपयांच्या वर गेले आहे. प्रवीण तोगडीया यांच्या आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेसह संघ परिवाराने भाविकांसाठी व्यवस्था केली असली तरी, वाढलेल्या प्रवासखर्चामुळे अनेक भाविकांचे नियोजन कोलमडले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हे वाढीव दर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article