कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलच्या महिला ट्रेनी डॉक्टरची अत्याचारातून निर्घृण हत्या झाल्याने पाच महिन्यांपूर्वी संपूर्ण देश सुन्न झाला होता. या प्रकरणात सीबीआयने मुख्य आरोपी संजय ऱॉय याच्यासह माजी डीन संदीप घोष सह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता.
कोलकाता येथी आरजी कर हॉस्पिटलच्या एका ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय या प्रकरणात सियालदह न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणात आता सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पाच महिन्यात आरोपपत्र दाखल होऊन मुख्य आरोपीला संजय रॉय या वैद्यकीय स्वयंसेवकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात बीएनएस धारा ६४,६६, १०३/१ च्या कलमांतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. ९ ऑगस्ट २०२४ रोजी रुग्णालयाच्या छाती विकारतज्ज्ञ विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलचा स्वयंसेवक संजय रॉय याला अटक झाली. १३ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास काढून सीबीआयच्या ताब्यात सोपविण्याचा आदेश कोलकाता हायकोर्टाने दिला. सीबीआयने १४ ऑगस्टपासून या प्रकरणाचा तपास सुरु केला. आरजी कर हॉस्पिटलचे माजी डीन संदीप घोष आणि घटनेच्या दिवशी ड्यूटीवर हजर असलेले चार डॉक्टर आणि एका सिव्हील वॉलंटियर सह इतर सहा लोकांची सीबीआयच्या मुख्यालयात पॉलीग्राफ सत्य शोधन चाचणी घेण्यात आली होती. सोमवारी या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे.
Published on: Jan 18, 2025 04:19 PM