गंजलेल्या तलवारीला धार लावून परिचिताचा केला खून:शिवीगाळीमुळे वचपा, माहुली जहागीरची घटना

2 hours ago 1
माहुली जहागीर येथे राहणारा एक २२ वर्षीय तरुण व ४५ वर्षीय व्यक्ती दारु पिले. त्यादरम्यान ४५ वर्षीय व्यक्तीने या २२ वर्षीय मित्राला शिवीगाळ केली. या शिवीगाळचा वचपा काढण्यासाठी तरुण घरी गेला व त्याला मारण्यासाठी तलवार घेतली. मात्र तलवार गंजली होती, त्यामुळे त्याने गावातच एका दुकानात जावून स्वत:च तलवारीला धार लावली आणि त्याच तलवारीने ४५ वर्षीय व्यक्तीचा खुन केला. ही घटना माहुली जहागीर येथे गुरुवारी १४ नोव्हेंबरला घडली. किशोर बैस ठाकूर (४५, रा. माहुली) असे मृतकाचे तर समाधान ऊर्फ रोहीत भाऊराव इंगळे (२२, रा. माहुली) असे मारेकऱ्याचे नाव आहे. किशोर व समाधान हे दोघेही एकाच गावात राहतात. ते दोघेही मद्यपी आहेत. दरम्यान गुरूवारी सकाळपासून किशोर व समाधान हे दारु पित होते. दरम्यान किशोरला दारु जास्त झाल्यामुळे तो गावातच एका ओट्यावर झोपून होता. त्यावेळी समाधानने त्याला आधार देवून घरी पोहोचवण्याचा निर्णय घेतला. तो किशोरला खांद्याचा आधार देवून घरी घेवून जात असताना किशोरने त्याला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे समाधान संतप्त झाला. त्याने किशाोरला सोडले आणि घरी परत गेला. त्याच्या घरात असलेली तलवार त्याने काढली. मात्र तलवार गंजली होती. त्यामुळे ही तलवार घेवून गावातच असलेल्या दुकानात तो घेवून गेला. धार लावणाऱ्याने मात्र त्याला धार लावून देणार नाही, असे सांगून हाकलून दिले. याचदरम्यान धार लावणारा काही वेळासाठी दुकानातून बाजूला गेला मात्र दुकान सुरूच होते. त्यावेळी समाधानने स्वत:च त्या दुकानातील ग्राईंडर घेवून तलवारला धार लावली. त्यानंतर कोणालाही दिसू नये म्हणून त्याने कापडात गुंडाळून तलवार नेली. त्यावेळी दारु अति झाल्यामुळे किशोर बैस उर्वरित. पान ४ समाधान इंगळे हॉटेलमध्ये काम करतो मारेकरी समाधान इंगळे हा अमरावतीत एका हॉटेलमध्ये काम करतो. तो घरी एकटाच राहतो. तसेच किशोर मागील अनेक वर्षांपासून माहुलीत एकटाच राहत होता. त्याची एक मातीची खोली आहे. किशारेची पत्नी शासकिय सेवेत आहे. मात्र हा दारुच्या अधीन गेल्यामुळे पत्नी अमरावतीला राहते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article