गीताबन कला महोत्सवात बाराशे विद्यार्थी सहभागी:तुर्काबादचा संघ ठरला उत्कृष्ट, गंगापूर- खुलताबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांचा होता सहभाग‎

1 day ago 1
लासूर स्टेशन येथील गीताबन कला महोत्सव नृत्य स्पर्धेत गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाण्यावर नृत्य करून विविध गटात रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र अशी तब्बल तीस पारितोषिके पटकावली. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन्ही तालुक्यातून ५१ शाळांच्या तब्बल बाराशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. आमदार प्रशांत बंब मित्रमंडळ गंगापूर व खुलताबाद तसेच परिवर्तन प्रतिष्ठान लासूर स्टेशन यांच्या वतीने आमदार प्रशांत बंब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कला महोत्सव घेण्यात आला. महोत्सवाचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य आणि लावणी या कला प्रकारात बहारदार आणि एकापेक्षा एक सरस नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्वात जास्त पारितोषिके पटकावून तुर्काबाद येथील जिल्हा परिषद शाळेने सर्वाधिक पारितोषिके पटकावून पहिला गंगापूर- खुलताबाद तालुक्यातील उत्कृष्ट संघ होण्याचा बहुमान मिळवला. यांना मिळाले बक्षिस : (समूह नृत्य वर्ग ५ ते ७) प्रथम जि.प.शा. तुर्काबाद, द्वितीय लिटिल स्टार इंग्लिश स्कूल अंबेलोहळ, तृतीय जि.प.शा. कनकोरी. (समूहनृत्य वर्ग ८ ते १२) प्रथम जिल्हा परिषद तुर्काबाद, द्वितीय जिल्हा परिषद गवळीशिवरा, तृतीय स्वामी विवेकानंद स्कूल अंबेलोहळ. लावणी वर्ग ८ ते १२ : प्रथम साक्षी कीर्तिकर (एसबी कॉलेज, रांजणगाव शेणपुंजी), द्वितीय कावेरी सरोदे ( लासूर), तृतीय जान्हवी विजय मोकळे (करंजगाव). वैयक्तिक नृत्य वर्ग ५-७ अनुक्रमे प्रथम अनुष्का नारायण माळे (जिल्हा परिषद शाळा, असेगाव), द्वितीय ऋतुजा आगळे (जिल्हा परिषद शाळा, तुर्काबाद), तृतीय राखी दादाराव गायकवाड (जिल्हा परिषद शाळा, माळीवाडगाव). वैयक्तिक नृत्य : वर्ग ८ ते १२ प्रथम अंकिता दत्ता लोंढे (शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव शेणपुंजी), द्वितीय अनुष्का भुजबळ (सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल, लासूर), तृतीय श्रद्धा सोमीनाथ क्षीरसागर (नवोदय विद्यालय, कन्नड).

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article