तीन शिक्षकांकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारFile Photo
Published on
:
06 Feb 2025, 3:29 am
Updated on
:
06 Feb 2025, 3:29 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूच्या कृष्णागिरीमधील बारगुर येथील शाळेच्या आवारात १३ वर्षांच्या मुलीवर शाळेतील तीन शिक्षकांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन सरकारी शाळेतील शिक्षकांना अटक करण्यात आली. यासोबतच जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (DEO) तीन शिक्षकांना निलंबित केले आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांखाली त्यांना अटक केली आहे. संशयित आरोपी शिक्षकांना १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती कृष्णगिरी जिल्हाधिकारी सी दिनेश कुमार यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिले आहे.
Tamil Nadu | A 13-year-old girl student was allegedly sexually assaulted by three teachers at a government middle school in Krishnagiri district. The three teachers have been suspended by the District Education Officer (DEO) and arrested under various sections of the Protection…
— ANI (@ANI) February 6, 2025