शिर्डी श्री साईबाबा संस्थानाने मोफत प्रसाद भोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कूपन दिले जाणार आहे.
शिर्डीतील मोफत अन्नछत्रासंदर्भात शिर्डी संस्थानकडून मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना अन्नछत्रात मिळणाऱ्या भोजनासाठी आता टोकन घेणं बंधनकारण असणार आहे. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शिर्डी संस्थानकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कूपन दिले जाणार आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काऊंटरवर हे कूपन वितरित केले जाणार आहेत. दरम्यान, गेल्याकाही दिवसांपूर्वी मोफत अन्न छत्रामुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढली असल्याचा भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दावा केला होता. याच सुजय विखे पाटील यांच्या दाव्यानंतर शिर्डी संस्थानकडून हा निर्णय जारी करण्यात आला आहे. नुकतीच पत्रकार परिषद घेऊन साईबाबा संस्थानकडून ही भूमिका जाहीर करण्यात आली आहे. शिर्डीत काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखेंनी वाढत्या गुन्हेगारीबद्दल केलेले वक्तव्य लक्षात घेता आता साई संस्थानाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिर्डीत मोफत जेवणासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता फक्त कूपन असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
Published on: Feb 06, 2025 11:45 AM