विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. मात्र त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडमुका स्वबळावर लढवण्याचे संकते दिले. याचदरम्यान देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आले असन ठाकरे गटाचं मिशन मुंबई महानगर पालिका सुरू झालं आहे.
त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. ” काहीजण मुंबई लुटायला आले आहेत, पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे ” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना मार्गदर्शन केलं. तसंच अनेक आमिषं येतील, पण त्याला बळी डू नका, भक्कमतेने लढा असा संदेशही त्यांनी या मार्गदर्शनादरम्यान सर्वांना दिला.
दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच संध्याकाळी सर्व शाखाप्रमुख आणि उपविभागप्रमुख यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक सूचना या शाखाप्रमख तसेच पदाधिकाऱ्यांना दिल्या. काहीजण मुंबई वाचवायला आलेत, पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपला वॉर्ड आणि संघटनाही मजबूत करा. तुम्हाला अजून आमिषं दाखवली जाती, पण त्याला बळी पडू नका, भक्कमपणे उभे राहून लढा अशा सूचनाही त्यांनी या बैठकीदरम्यान दिल्या.
7 तारखेपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण
दरम्यान, उद्यापासून, म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण होणार आहे. त्याअंतर्गत मुंबईतील प्रत्येक शाखेसाठी एक निरीक्षक नेमला जाणार असून हा निरीक्षक शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडून आढावा घेणार आहे.. मुंबईतील प्रत्येक शाखेला एक निरीक्षक असे निरीक्षक मुंबईत प्रत्येक शाखेत जाऊन आढावा घेतील. त्याच सोबतच निरीक्षक शाखा बांधणीचा आढावा देखील घेणार आहेत शाखेचे पदाधिकारी आहेत की नाहीत कोणती आणि किती पद खाली आहेत याचा संपूर्ण अहवाल हा निरीक्षक येत्या 2 ते 3 दिवसांत शिवसेना भवन येथे सादर करणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठीच शाखा निरिक्षक नेमून शाखा सर्वेक्षण उद्यापासून सुरू करण्यात येईल. तसेच गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची माहिती समोर आली आहे.