रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेताना तरुणाला कोयना एक्सप्रेसने चिरडल्याची घटना बदलापूरजवळ घडली. साहीर अली असे मयत तरुणाचे नाव आहे. साहीर मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून अंबरनाथ येथे नातेवाईकांकडे आला होता. अंबरनाथ-बदलापूरदरम्यानच्या फ्लायओव्हरखाली सर्वांनी आधी ग्रुप फोटो घेतला, मग साहिर सेल्फी घेत होता. यादरम्यान ट्रॅकवर कोयना एक्सप्रेस येत होती.
सेल्फीमध्ये गुंग असलेल्या साहीरचे ट्रेनच्या हॉर्नकडे लक्ष नव्हते. आसपासचे लोकही साहीरला आवाज देत होते. मात्र साहीरचे लक्षच गेले नाही आणि कोयना एक्सप्रेसने त्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.