Published on
:
06 Feb 2025, 6:07 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:07 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता वीर पहाडिया आणि स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेचा वाद सोशल मीडियावर रंगला आहे. स्टँडअप शोमध्ये केलेल्या विनोदानंतर दोघांतील वाद रंगला. नेमकं काय झालं जाणून घेऊया. अभिनेता वीर पहाडिया सध्या स्काय फोर्स चित्रपटावरून चर्चेत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेने एका स्टँड-अप शोच्या वेळी अभिनेता वीर पहाडियाची खिल्ली उडवली. पण हा विनोद पचनी न पडलेल्या लोकांनी प्रणित मोरेवर टीका करणे सुरु केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर वाद निर्माण झाला.
प्रणित मोरे एक प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे. जो आपल्या खास कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा फॅन फॉलोईंग वर्ग वेगळा आहे. तो सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह आहे आणि तिच्या इन्स्टाग्रामवर हजार फॉलोअर्स देखील आहेत.
कॉमेडियन प्रणित मोरेने स्वत: सांगितलं की, सोलापूरमध्ये एका शो च्या दरम्यान प्रणितने अभिनेता वीर पहाडियाची खिल्ली उडवली होती. शोनंतर काही फॅन्स त्याच्यासोबत सेल्फी काढत होते. तेव्हा एक ग्रुप आला आणि त्यांनी स्वत:ला फॅन असल्याचे सांगत प्रणितची भेट घेतली. पण त्यांचा उद्देश वेगळाचं होता. त्या ग्रुपने प्रणित मोरेवर हल्ला केला आणि मारहाण केली. मीडिया रिपोर्टनुसार, त्यातील एकाचे नाव तनवीर शेख होतं, त्याने धमकी दिली की, जर पुन्हा वीर पहाडियावर विनोद केलास तर वाईट होईल.
सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. ते हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रणित मोरेने आपल्या फॅन्सना शांततेचं आवाहन केले आहे. आणि सांगितले की त्याला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.
वीर पहाडियाने मागितली माफी
या संपूर्ण घटनेनंतर वीर पहाडियाने म्हटले की, ''मी स्वत: या घटनेने खूप दु:खी आणि चिंतेत आहे. कॉमेडियन प्रणित मोरेसोबत जे घडलं, ते खूप दु:खद आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, माझा याच्याशी कोणताही संबंध नाही. मी प्रत्येक प्रकारच्या हिंसेचा विरोध करतो. कुणालाही नुकसान पोहोचवण्याचा विचार देखील करू शकत नाही.” प्रणित आणि त्याच्या फॅन्सची वीर पहाडियाने माफी मागितली. तो म्हणाला, जे काही घडलं, मी त्याबद्दल माफी मागतो.