मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगPudhari News network
Published on
:
03 Dec 2024, 9:24 am
Updated on
:
03 Dec 2024, 9:24 am
ठाणे : आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धेसारख्या खेळविण्यात येतील असे प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी नुकतेच ठाण्यात बोलताना केले.
महायुतीचे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवर मजबूत काम करत आहे. म्हणून आपण सुद्धा क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम एकत्र करूयात आणि येत्या पाच वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर 50 मैदाने उभारण्याचा निर्धार ठेवू, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे.
ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 48 व्या एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. त्यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी वरील वक्तव्य केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या 16 वर्षांखालील स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्री माँ विरुद्ध कल्याण येथील के. सी. गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. के सी गांधी स्कूलने श्री माँ विद्यालय शाळेचा पराभव करत एन. टी. केळकर चषकावर आपले नाव कोरले. गेली दोन वर्ष श्री माँ विद्यालयाने हा चषक जिंकला होता. मात्र ह्या वर्षी के. सी. गांधी शाळेने पारितोषिक जिंकल्याने त्यांची हॅट्ट्रिक हुकली. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न, ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
45 षटकांच्या या स्पर्धेत श्री माँ विद्यालय शाळेने प्रथम फलंदाजी करून 34.4 षटकात 117 धावांवर के सी गांधी शाळेच्या गोलंदाजांनी रोखले तर 117 धावांचा पाठलाग करतांना श्री माँ विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत के सी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना 30 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून 6 गडी राखून हा सामना जिंकला.
स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीग (चझङ) चे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य विकास पाटील, डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनचे सेक्रेटरी एम. डी. मराठे, अध्यक्ष जयंत वेलदे, सदानंद केळकर आदी उपस्थित होते. तर बाळाराम खोपकर यांनी सूत्रसंचालन केले.