तणनाशक फवारून केळी बागेचे केले नुकसान:करमाळा तालुक्यातील 15 दिवसापूर्वीची घटना, निवडणूकीच्या धामधुमीत पोलिसांचे दुर्लक्ष
3 hours ago
1
प्रतिनिधी | वाशिंबे केळीच्या बागेवर अज्ञाताने तणनाशकाची फवारणी केल्याने काढणीस आलेल्या पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिवरवाडी (ता. करमाळा) येथे १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या प्रकारानंतर अज्ञातांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. पण निवडणुकीचे कारण सांगून तपासकडे दु्र्लक्ष केले असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणी भिवरवाडी येथील शेतकरी परमेश्वर पाबळे यांनी फिर्याद दिली आहे. १२ नोव्हेंबर रोजी शेतातील कामे करुन ते गेले. दुस-या दिवशी १३ नोव्हेंबर रोजीे फिर्यादीचे चुलत भाऊ वैभव पाबळे हे शेतात गेल्यावर केळीच्या घडावर निळसर औषध फवारल्याचे दिसून आले आणि वासही येत होता. दरम्यान दुपारी ४ ते ५ च्या सुमारास केळीचे घड सुकू लागले होते. दुसऱ्या दिवशी सर्वच केळीचे घड करपलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पण निवडणुकीमुळे तपास झाला नाही. अडीच एकर बागेवर ६० ते ६५ टन केळीचे अंदाजे १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केळी निर्यातदार कंपनीशी 28 रुपये प्रमाणे व्यवहार झाला होता. अशा प्रकरणात नुकसान भरपाई मिळत नाही असे कृषी विभागाने सांगितल्याचे पाबळे यांनी सांगितले. ^ भिवरवाडी येथील केळी बागेवर तणनाशक फवारणी केलेल्या केली बागेचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही गोष्टीला विलंब झाला नाही.याप्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, करमाळा
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)