त्रिपुरारी पौर्णिमेला हिंदू जनजागृती समितीतर्फे ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी':विविध मंदिरांना दिल्या भेटी,विश्वस्तांशी साधला संवाद

2 hours ago 1
त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात आणि घरांमध्ये दिवे लावून हिंदू बांधवांनी यावर्षीही दीपोत्सव साजरा केला. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्थित त्रिपुर (दीपमाळ) प्रज्मलित केले गेले. यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी' हा उपक्रम हिंदू जनजागृती समितीतर्फे देशभरात राबवून जनजागृती करण्यात आला. धर्मजागृतीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्या प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आसुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बऱ्याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. सध्या समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदू राष्ट्र यावे या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी' या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या हिंदू धर्मप्रेमींनी मंदिरे, घरी आदी ठिकाणी दीप प्रज्ञ्चलित करताना एक दीप हिंदू राष्ट्रासाठीं याविषयीचे फलक हातात धरून लोकांचे प्रबोधन केले. काही ठिकाणी सामूहिक दीपपूजन करताना हिंदू राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. Â अकोला जिल्ह्यात विविध मंदिरात हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी रमेश अलकरी, काळा मारुतीची ट्रस्टी नरेश आगरकर, विनोद केवाडे , सभासद , पाठक विश्वस्त , सुरेश देशमुख सदस्य आदी उपस्थित होते. हा उपक्रम श्री राम मंदिर व गजानन महाराज संस्थान येथे करण्यात आला. Â मलकापूर परिसरातील कोठारी वाटिका नंबर ३ येथील शिव शक्ती महिला भजन मंडळ, हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात एक दीप हिंदू राष्ट्रासाठी लावला दीप लावण्यात आले. वेळी मंदिर ट्रस्टी तसेंच धर्मप्रेमी उपस्थित होते. येथे राबवण्यात आला उपक्रम

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article