"त्रिमूर्ती संकुलातील प्रवचन, सततच्या ध्यानधारणेमुळे होतो अमूलाग्र बदल':नेवासे फाटा येथील बालसंस्कार शिबिरात 7 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

2 hours ago 1
नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल व शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन दांडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी जीवनात मानसिक व भावनिक संतुलन या विषयावर श्रीशिवकृपानंद स्वामीजी फाउंडेशनच्या गुरुमाँ यांनी प्रवचन दिले. ध्यान काय आहे? ध्यानामुळे आपल्या मनातील नैराश्य निर्माण करणारे विचार बाहेर पडतात. ध्यान केल्याने आपल्या हातून कुठलीही चूक घडत नाही. घरातील कचरा ज्याप्रमाणे आपण दररोज बाहेर काढतो. त्याचप्रमाणे ध्यान केल्याने मनातील वाईट विचारांची घाण बाहेर फेकली जाते, असे गुरुमाँ यांनी सांगितले. २ ते ५ ऑक्टोंबरपर्यंत त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल, नेवासे फाटा येथे राजमाता सभागृहात बालसंस्कार प्रदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे ही सुमारे ७००० विद्यार्थी, विद्यार्थीनी लाभ घेतला. मीनाताई जगधने, सुनीता गडाख यांच्यासह २२५ साधक प्रवचनासाठी आले होते. गुरूकार्यासाठी हेमांगी भट्ट, आशिष कालावाड, ऋता कालावाड, जयप्रकाश, नरसिंहराव, धर्मराज देशमुख, कल्याणी देशमुख, सोनाली पवार, प्रियांका तिवारी, सुभाष धवन, मंदा धवन उपस्थित होते. फुलपाखरू ज्याप्रमाणे कोषामध्ये स्वतःला काही दिवस कोंडून घेते. त्यानंतर त्या फुलपाखरास विविध रंगांचे पंख फुटतात. सतत ध्यान केल्याने आपल्यामध्ये अमुलाग्र बदल होतो, असेही गुरुमाँ यांनी सांगितले. विद्यार्थी जीवनात मानसिक व भावनिक संतुलन हा विषय असलेल्या प्रवचनाचा सुमारे ४५०० निवासी विद्यार्थी व विद्यार्थीनी लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे गुरुमाँ यांनी अगदी सोप्या भाषेत निरसन केले. या सर्वांना संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगे, सुमती घाडगे, स्नेहल घाडगे, मनीष घाडगे, प्राचार्य आरसुळे, प्राचार्य सोपान काळे, सचिन कर्डिले, जितेंद्र पाटील, अनुराधा गोरे, अनिता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article