दहा महिन्यांत 50 हजारांवर रुग्णांना रुग्णवाहिकेचा लाभ:108 टोल फ्री क्रमांकावर कॉल करा, 24 तास सेवा

6 hours ago 1
आरोग्य विभागात रुग्णवाहिकेची भूमिका ही महत्त्वाची असते. ग्रामीण भागात आजही सर्व प्रकारच्या अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे बहुतांश रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागते. अशा वेळी संबंधित रुग्णाला तातडीने उपचार सुविधा मिळाव्यात, याकरिता रुग्णालयात पोहोचवण्यासाठी १०८ क्रमांकाच्या १६ आणि १०२ क्रमांकाच्या ४४ अशा एकूण ६० रुग्णवाहिका मोफत सेवा देत आहे. जिल्ह्यात मागील दहा महिन्यांत सुमारे ५० हजारांवर रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा मिळाली आहे. कोणत्याही रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये, प्रत्येकाला उपचाराची सुविधा तातडीने मिळावी, यासाठी १०८ आणि १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. या १०८ किंवा १०२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करताच रुग्णांना रुग्णालयात मोफत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली जाते. जिल्ह्यातील या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णांना तातडीने सेवा पुरवली जाते. परंतु, जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्याने ती वाढवून देण्याची मागणीही होत आहे. तसेच १०८ रुग्णवाहिकेची सेवा दिल्यानंतर रुग्णवाहिका चालक, डॉक्टर हे रुग्ण आणि नातेवाइकांची विचारपूस करून त्यांना मानसिक आधार देण्याचे कामही करतात. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आवश्यक उपचार सुविधा मिळावा यासाठी १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मोफत सेवा दिली जाते. १०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिकेची सेवा नागरिक घेऊ शकतात. ही सेवा २४ तास सुरू राहते. रूग्णसेवक या रुग्णवाहिकेसोबत येऊन रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यापर्यंत सेवा देतात. गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालय कल्याण समितीचे सदस्य तथा रुग्णसेवक नितीन सपकाळ यांनी दिली. ५० हजार जणांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा ^जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ऑक्टोबर २०२४ या १० महिन्यांमध्ये ५ ० हजार ३६४ रुग्णांनी १०८ व १०२ टोल फ्री रुग्णवाहिकेचा लाभ घेतला आहे. यामध्ये ४४ हजार ७८९ रुग्ण हे मेडिकल उपचार, १ हजार १३९ अपघातग्रस्त, ३००१ प्रसूती सेवा, १ हजार ५०६ हृदयविकार तसेच इतरही वेगवेगळ्या रुग्णांनी या रुग्णवाहिकेची सेवा घेतली आहे. खेडेगावात १०८ ही रुग्णवाहिका तातडीने सेवा पुरवत रुग्णांचे प्राण वाचवत त्यांना जीवदान देत आहे. - डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article