दिल्ली विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. ANI X Account
Published on
:
05 Feb 2025, 2:11 pm
Updated on
:
05 Feb 2025, 2:11 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी (दि.५) मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले. विधानसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात मतदान झाले. निवडणुकीचे एक्झिट पोल (Delhi Election Exit Poll ) येण्यास सुरुवात झाली असून बहुतांश एक्झिट पोलमधून भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एका पोलमधून आम आदमी पक्ष (आप) पुन्हा सरकार स्थापन करेल, असे म्हटले आहे. (BJP vs AAP)