धनंजय मुंडेंकडे आर्थिक लाभाचे पद:त्यांचा ताबडतोब राजीनामा घ्या, अंजली दमानिया यांची मागणी; मुंडेंना परळीची राख भोवणार?
2 hours ago
1
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आर्थिक लाभाचे पद असल्याचा दावा करत ताबडतोब त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. महाजेनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. त्यामुळे मंत्रिपदावर असताना धनंजय मुंडे या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतात? असा सवाल अंजली दमानिया यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मंत्री धनंजय मुंडे हे सध्या त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामु्ळे अडचणीत सापडलेत. वाल्मीक कराड हे आवादा पवनचक्की कंपनीकडून 2 कोटींची खंडणी वसुली प्रकरण व सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील एक संशयित आहेत. यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुरावे मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही अशी भूमिका गेतली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे आर्थिक लाभाचे पद असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घ्या अंजली दमानिया शनिवारी एका ट्विटमध्ये म्हणाल्या, हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. लाभार्थी! धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घ्या. वेंकटरश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. ह्यात आधी वाल्मीक कराड डायरेक्टर होते. आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते? महाजेनकको (Mahagenco) ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी (wholly owned subsidiary) आहे. असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? मी त्यांच्या कंपनी चे Annexures खाली जोडत आहे, ज्यावर धनंजय मुंडे व राजश्री मुंडे यांची सही देखील आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. उज्ज्वल निकम यांना वकीलपत्र देण्यास विरोध उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचे वकीलपत्र ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यासही विरोध दर्शवला आहे. DCC बँकेच्या घोटाळ्यात धनंजय मुंडे यांची जगमित्र स्पिनिंग मिलच्या bail साठी त्यांचे वकील एडव्होकेट अनिकेत निकम होते, जे उज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत. आज बातमी होती की मुख्यमंत्री हे उज्वल निकम यांना भेटले. त्यांना ही केस देणे योग्य ठरणार नाही. उज्वल निकम यांच्याबद्दल अनादर नक्कीच नाही, पण in all fairness and in the interest of justice, मुख्यमंत्र्यांनी ही केस दुसऱ्या एका तज्ज्ञ वकिलांकडे द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)