वाल्मीक कराडचा जेलमधील मुक्काम वाढणार की, जामीन मिळणार?:सुरक्षेसाठी सर्व आरोंपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले जाणार

3 hours ago 1
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सध्या एसटीच्या ताब्यात आहेत. या सर्व आरोपींची एसआयटी कोठडी आज संपणार असून आरोपींना आज बीड येथील जिल्हा न्यायालयात व्हिसीद्वारे हजर केले जाणार आहे. त्यामुळे आता या आरोपींना पुन्हा एसआयटी कोठडी मिळते का? की त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची कोठडी आज संपत आहे. तर प्रतिक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांची देखील बारा दिवसांची कोठडी संपत असल्याने या सर्व आरोपींना व्हिसीच्या माध्यमातून न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. सध्या या सर्व आरोपींना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातला लॉकअप मध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यासाठीच्या पथकाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष हजर न करता विशेष व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहेत. यामधील दोन आरोपी हे तलवाडा पोलिस ठाण्यात आहेत. तर दोन गेवराई तर दोन माजलगाव पोलिस ठाण्यामध्ये आहेत. या सर्व आरोपींना या पोलिस ठाण्यामधूनच व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते? हे पहावे लागणार आहे. यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगितले असल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराडचा जेलमधील मुक्काम वाढणार की, जामीन मिळणार? संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला वाल्मीक कराड याला देखील मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर वाल्मीक कराडला सात दिवसांची कोठडी सुनवण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराडला जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कोर्टामध्ये लगेच जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाला सीआयडी पथकाकडून कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मीक करडचा असलेला संबंध? याची चौकशी करायची असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती सीआयडीने न्यायालयाकडे केली आहे. यात जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालया समोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे वाल्मीक कराडचा जेलमधील मुक्काम वाढणार की, त्याला जामीन मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article