धनगर आंदोलकांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर घेतल्या उड्या:आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

2 hours ago 1
आदिवासी नेते आमदार नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आरक्षणाच्या बचावासाठी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या घेत आंदोलन केले होते. आज धनगर समाजबांधवांनी धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या घेत आंदोलन केले आहे. धनगर आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषणाला बसलेले आंदोलक आज मंत्रालयात दाखल झाले. धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्या, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. मागणीच्या निवेदनाची कागदपत्रे हातात घेवून या आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळ्यांवर उड्या घेतल्या. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना बाहेर काढले. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र वेळ निघून गेली असून आज आमची बैठक रद्द केली, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. बातमी अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article