नामपूर तालुका निर्मिती हालचाली, अपर तहसीलसाठी मागितला प्रस्ताव:नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, टेंभे, मुल्हेर मंडलांचा समावेश
1 day ago
2
मालेगाव जिल्हा निर्मितीबरोबरच नामपूर स्वतंत्र तालुका निर्मितीबाबत शासन विचाराधीन असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नामपूरला स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव २६ जानेवारीच्या आत तातडीने मागविण्यात आला आहे. बागलाण तहसील कार्यालयाने याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. बागलाण तालुक्याचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या, दप्तरदिरंगाई लक्षात घेत सटाणा तहसीलचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी बागलाण तहसीलच्या पाच मंडलांचे विभाजन होऊन नामपूर येथे स्वतंत्र अपर तहसीलदारपदाचा प्रस्ताव २६ जानेवारीच्या आत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तातडीने मागितला आहे. प्रस्ताव तयार झाला असून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला जाणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला. ^नामपूर येथे स्वतंत्र अपर तहसीलदारपदाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. बागलाण तहसीलचे नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, टेंभे, मुल्हेर ही पाच मंडल नामपूर अपर तहसीलदार कार्यालयाला जोडले जाणार आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजाला वेग येईल. अपर तहसीलदार कार्यालयासाठी शासनाच्या आदेशानुसार कर्मचारी व कार्यालय देण्यात येणार आहे. - कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)