निवडणुकीदरम्यान सातपट रोकड जप्त:706 कोटींचा ऐवज पकडला, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा झाली वाढ
2 hours ago
1
मतदारांना आमिष देण्यासाठी रोकड, मद्य, सोने-चांदीने या वेळी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. रोख रकमेसह एकूण 706 कोटी 98 लाखांचा ऐवज निवडणूक आयोगाने जप्त केला. मागील वेळी हा आकडा फक्त 103.61 कोटींपर्यंतचा होता. म्हणजेच 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत 7 पटीने अधिकचे आमिष मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो निवडणूक आयोगाने हाणून पाडला आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये थेट लढत झाली होती. पण 21 जून 2022 दरम्यान शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी पक्षही फुटला. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यामुळे यंदा 20 नोव्हेंबरपर्यंत पैशांचा महापूर पाहण्यास मिळाला. 183. 48 कोटींची राज्यात निव्वळ रोकड जप्त केली आहे. 93.13 कोटी रुपये किमतीची दारू, बिअर, रम हस्तगत केली.
एमडी ड्रग्ज, कोकेन निवडणूक कर्मचाऱ्यांनी जप्त केले. सर्व प्रकारच्या ड्रग्जची किंमत 72.14 कोटी आहे. सोने, चांदी आदी मौल्यवान धातू पकडण्याचाही या वेळी उच्चांक आहे. मागील वेळी फक्त 40.35 कोटींचे मौल्यवान धातू पकडले होते. इतर प्रकारच्या आमिषांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूही पकडल्यात. त्याची किंमत 80.94 कोटी आहे. असे राज्यात एकूण 706.98 कोटींची रोकड, मद्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. सोलापूर ते सांगोला रोडवर 19 कोटींची सर्वाधिक रोकड जप्त केली होती. त्याखालोखाल पालघरच्या वाडा पोलिस ठाणेअंतर्गत 3.70 कोटी रुपये पकडले होते. महाराष्ट्रात जप्त करण्यात आली 3052 शस्त्रात्रे राज्यभरात 78 हजार 267 शस्त्रे परवान्यासह दिलेली आहेत. त्यापैकी पोलिसांनी 56,604 शस्त्रे आचारसंहितेच्या काळात जमा करून घेतली आहेत. मात्र 235 शस्त्रे परवान्यासह जप्त केली आहेत. परवाने नसताना शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांकडून 2206 शस्त्रे कायमची जप्त केली आहेत. परवाने रद्द करून 611 शस्त्रे कर्मचाऱ्यांनी जप्त केली आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)