Agriculture Scam Anjali Damania connected Dhananjay Munde : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी खात्याची आज आब्रू वेशिला टांगली. महायुती सरकारमध्ये गेल्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोटाळ्याची लडच लावल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची राळ, आता उत्तर देणार का?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज राज्याच्या कृषी खात्याची अब्रू वेशिला टांगली. महायुती सरकारमध्ये गेल्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुडे यांनी घोटाळ्याचा धडाकाच लावल्याचा मोठा आरोप त्यांनी केला. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध घोटाळ्याची मालिकाच समोर आणली. एकामागून एक यादीच वाचून दाखवली. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे कृषी विभागाची लक्तरं टांगल्या गेली. त्यांनी आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही असा सवाल केला.
बातमी अपडेट होत आहे…