नेताजी न्यूजरूममध्ये आमदार अतुल सावे:685 कोटींचे रस्ते, 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना, 52 हजार कोटींचे उद्योग हेच माझे भांडवल- सावे

3 hours ago 1
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना विकासाचा मुद्दा महत्त्वाचा होता, असे मत राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. दैनिक दिव्य मराठी आयोजित नेताजी न्यूजरूममध्ये कार्यक्रमात अतुल सावे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. केवळ विकासाच्या मुद्द्यावर तिसऱ्यांदा लढत असल्याचे सांगितले. केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्याकडे आहे. आपल्याविरोधात उभे असलेले एआयएमआयएमचे उमेदवार आमदार व खासदार अशी दहा वर्षे होते. त्यांनी काेणती विकासकामे केली यासंबंधी सांगावे, असे खुले आव्हान सावे यांनी दिले. न्यूजरूममध्ये शहरातील विविध संस्था-संघटनांशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात वार्तालाप केला. अनेक तरुणांनी ऑनलाइन प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तरे सावे यांनी दिली. भविष्यातील शहराचे व्हिजन सांगितले. निवडणूक कुठलीही असली तरी ती सोपी नसते किंबहुना आपण तिला हलक्यात घेत नसल्याचे सावे यांनी सांगितले. २०१४ आणि २०१९ मध्ये मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळे निवडणुकीत यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. लक्ष्मीनारायण राठी व्यापाऱ्यांना उद्योजकांचा दर्जा, डीएमआयसीमध्ये सवलतीत भूखंड द्यावेत, विकास निधीचे प्राधिकरण व्हावे, वीज दरात सवलत द्यावी? अतुल सावे : ऑरिक सिटीत जागा उपलब्ध नाही. डीएमआयसीच्या पुढच्या टप्प्यात यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेईल. व्यापाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध करून दिले जातील. वीज दरासंबंधी विचार करताना आता सोलार एनर्जीचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला. त्यासाठी अनुदानही दिले जाते. पुणे, मुंबईला जाणारे तरुण भविष्यात शहर परिसरात ५२ हजार कोटींचे उद्योग सुरू झाल्यानंतर काही प्रमाणावर थांबतील. संतोष कावळे विकसित छत्रपती संभाजीनगरचे व्हिजन मांडणार काय? अतुल सावे : टोयोटा-किर्लोस्कर, जिंदाल, अथर, लिब्रेझोल, कॉस्मो, पिरामल आदी उद्योगांसाठी प्रयत्न केले. संबंधितांनी डीएमआयसी, ऑरिकमध्ये जमीन खरेदी केली. उद्योग उभारणीचे काम सुरू झाले. यामुळे शहर परिसरात वैभव येईल.डीपी प्लॅन अंतिम होतोय. कुणाच्या मालमत्तांवरून रस्ते जाणार नाही याची काळजी घेतली गेली. सिडकोचे फ्री होल्ड करताना अत्यल्प शुल्क निश्चित केले. ॲड. चंद्रकांत थोरात नगर आणि नाशिकप्रमाणे शेंद्रा ते वाळूज सलग उड्डाणपूल व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे? अतुल सावे : प्रस्ताव तयार केला होता. डीपीआरवर खर्चही केला. काही तांत्रिक अडचण आली, ती लवकरच दूर केली जाईल. शेंद्रा ते वाळूज रस्ता विविध संस्थांमध्ये विभागला गेला आहे. मनपा, रस्ते विकास महामंडळ, सां. बा. विभाग, छावणी आदी संपूर्ण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत आणावा लागेल तेव्हा त्याला निधी उपलब्ध होईल. त्यासाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. पाणी योजनेत मनपाचा हिस्सा शासनास देण्यास भाग पाडले नवीन पाणीपुरवठा योजना केवळ ५५ दिवसांत मंजूर केली. १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा केंद्राच्या अमृत २ मध्ये समावेश केल्यानंतर आता योजनेची किंमत २७४० कोटींत गेली आहे. ८२२ कोटींचा हिस्सा राज्य शासनाने भरण्याची जबाबदारी घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बैठका घेतल्य . सॉफ्ट लोनसंबंधी त्यांनी अनुमती दिली. दिव्य मराठी : २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून २५ कोटी रस्त्यांसाठी आणले, कचऱ्यासाठी आणलेला निधी ९४ कोटी, नवीन पाणीपुरवठा योजना १६८० कोटी रुपये आणले, परंतु प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली, प्रशासकीय यंत्रणेचे दुबळेपण म्हणावे काय? अतुल सावे : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये व्हाइट टॉपिंगसाठी २५ कोटी रुपये मंजूर केले. शहरात सर्वप्रथम व्हाइट टॉपिंगच्या कामास प्रारंभ झाला. अशा प्रकारे झालेल्या कामांच्या दर्जासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. पाणीपुरवठा योजनेच्या जलद कामांसंबधी खंडपीठाने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. ही उत्तम बाब आहे. दिव्य मराठी : छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विरोधक कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले? उबाठाचे राजू वैद्य, अनेक हिंदू उमेदवार? भाजपचे अनेक उमेदवार उबाठाकडे गेले? अतुल सावे : प्रत्येक पक्ष आपल्या युतीसोबत काम करीत आहे. निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. उबाठात आमचे उमेदवार गेले नाहीत. उबाठाकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली. आपण एआयएमआयएमचे उमेदवार यांना आपला प्रतिस्पर्धी समजतो. आपली लढत त्यांच्यासोबतच आहे. अतुल सावे यांनी शहरासाठी मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीनगरात १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत केला. पाण्यासाठी नागरिक आसुसलेले होते. सावेंनी योजनेला गती तर दिलीच, शिवाय केंद्राने योजनेसाठी सातशे कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिल्याचे मोदी यांनी सांगितले. पूर्व मतदारसंघामध्ये आमदार अतुल सावेंनी केली ही कामे सुशोभीकरण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिडको एन-७, नारेगाव आणि जयभवानीनगर येथील पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यात आले. १६ बुद्धविहारांचा विकास केला. सात बुद्धविहारांचा विकास प्रस्तावित आहे. उद्योग: औद्योगिक वसाहतीमध्ये टोयोटा-किर्लोस्कर कंपनी, अथर, पिरामल यासह पाच महत्त्वाच्या उद्योगातून ५२ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. याद्वारे २५ हजार रोजगारांची निर्मिती होईल.यामुळे छोट्या उद्योगांच्या उभारणीला चालना मिळेल. क्रीडा : अाविष्कार कॉलनीत राजीव गांधी क्रीडांगणाच्या विकासासाठी १ कोटी ४० लाखांच्या कामाचा शुभारंभ केला. एन-३, एन-१ आणि एन-५ येथे प्रत्येकी ३ बॅडमिंटन हॉल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्ते: स्मार्ट सिटीअंतर्गत ३०० कोटींचे रस्ते बनवले. भूमिगत ड्रेनेजलाइनसाठी १९६ कोटींचा निधी मंजूर केला. इतर निधीतून ३७४ कोटींच्या रस्ते कामाला मूर्त रूप दिलेे. आमदार निधीतून १८ कोटी आणि विशेष निधीतून १०० कोटींचे रस्ते करण्यात आले. दलित

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article