पहिल्यांदाच आव्हान स्वीकारून 71 शस्त्रक्रिया करून अंधांना दिली दृष्टी:संगमनेर येथे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे प्रतिपादन
2 hours ago
1
अन्याय झाल्यानंतर संधी असते. कारण, तेव्हा तुम्हाला राग आलेला असतो आणि माणूस रागात खूप चांगले करू शकतो. तशी परिस्थिती निर्माण झाली नाही, तर तुमच्यासमोर काही नसेलच, तर तुम्ही स्पर्धा कोणाशी करणार? आणि म्हणून ही स्पर्धा जेव्हा निर्माण होते, तेव्हा यश हमखास येते. आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर फक्त एकच काम करा ती गोष्ट म्हणजे अभ्यास. मी माझ्या आयुष्यात अनुभवाने शिकलो. मी इथे उभा आहे. अनावश्यक गोष्टीला महत्त्व देऊ नका. त्यासाठी इच्छाशक्ती लगते. अडचणीवर मात केली तरच यश मिळते. दैवाला मानले पाहिजे. नशिब अशी गोष्ट आहे ते अनुभवातीत आहे. आयुष्यात पहिले आव्हान स्वीकारून ७१ ऑपरेशन केले. एकही रुग्ण आंधळा राहिला नाही. असे लाखो ऑपरेशन केले. असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. संगमनेर मालपाणी लॉन्स येथे कवी अनंत फंदी व्याख्यानमालेत लहाने बोलत होते. डॉ. लहाने म्हणाले, रिसर्च बदलला. समाजकार्य काय असते ते बाळकडू आमटे यांच्याकडून घेतले. निसर्ग खूप चांगला आहे. आयुष्यात रिअॅक्ट होऊ नका? दृष्टिकोण असेल, तर डोळ्याला दृष्टी देता येते. डॉ. तात्यारव लहाणे म्हणजे डोळे देणारा देवदूत होत, अशी ख्याती लोकांनी, रुग्णांनी मला दिली. विज्ञान, देव, विश्वास या त्रिसूत्रीला मी मानतो, असेही लहाने म्हणाले. आज न्यूक्लियर फॅमिली तयार झाली. सायटोप्लाझम पेशी म्हणजे आई. आपल्या पेशीत आई-बाप आहेत. दुसऱ्यासाठी काम करा. वाकायला शिकल्याने नम्रता येते. अनेक ऑपरेशन केले. परंतु हात कधीही थरथरला नाही. परंतु आईच्या अंतिम संस्काराच्या वेळी मडके हातात धरले. त्यावेळी जणू काही कंपवात सुटला. तर अग्नी संस्कारप्रसंगी माझीही किडनी खूप दुखत होती. विश्वास न बसणाऱ्या दुःखाची मी अनुभूती घेत होतो. कारण काय, तर आईंनी मला किडणी दिली होती. हे ऐकून लॉन्समधील प्रेक्षक काही काळ स्तब्ध झाले. डॉ. लहाने म्हणाले, अनुभव आपला गुरू बनतो. तर मेरीट मदत करेल, असेही होत नाही. कमवा शिकामध्ये ३० रुपयांत शिक्षण झाले. दोन्ही किडणी निकामी झाल्या. त्यावर अशिक्षित आई डॉक्टरांना म्हणाली की किडनी चलती का? आईने दिलेली किडणी मला परफेक्ट बसली. १६६ टाके पडले होते आईला. आईचे हसू आजही विसरलो नाही. माझ्यासाठी आई ही इन्स्पेरेशन असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुभवाची शिदोरी माणसाला सर्वकाही शिकवते लातूरमधील माटेगावमध्ये आजही गाडी जात नाही. माझ्या बालपणी रॉकेल, गोडतेल, कंदिल, दिवा नव्हता. सूर्यप्रकाश हाच आपला दिवस. कॉपी केली असती, तर तात्याराव झालो नसतो, असे अंगावर शहारे आणणारे, ऊर्जा देणारे अनेक अनुभव डॉ. लहाने यांनी कथन केले. गुरे राखत अभ्यास केला. अन् मराठवाड्यात दहावा आलो. म्हैसीचा अभ्यास हा एसीच्या अभ्यासापेक्षा वेगळा अनुभव देतो, असेही पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी यावेळी बोलताना सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)