पिंपळनेर येथील वरिष्ठ महाविद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी यशराज दत्तात्रय शेजूळ याचा उपक्रमशील विद्यार्थी म्हणून गौरव करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल बी पवार. समवेत शिक्षकवृंद.(छाया:अंबादास बेनुस्कर)
Published on
:
03 Dec 2024, 9:50 am
Updated on
:
03 Dec 2024, 9:50 am
पिंपळनेर,जि.धुळे : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील कला वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात एफ. वाय. बी. कॉम वर्गातील दिव्यांग विद्यार्थी यशराज दत्तात्रय शेजूळ याचा सन्मान करण्यात आला.
नियमीत तासिकांना हजर राहणारा आणि दिव्यांगाबाबत कोणताही संकोच मनात न ठेवता प्रत्येक उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारा "उपक्रमशील विद्यार्थी " म्हणून यशराज शेजूळ याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. प्रा.एल.जे.गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
यशराज हा पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ रावसाहेब यांचा मुलगा आहे. मात्र तो वडिलांची कोणतीही ओळख न सांगता महाविद्यालयाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होतो. दिव्यांग असूनही तो अगदी सर्व ठिकाणी उपस्थित राहतो, महाविद्यालयाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीत सहभागी होतो.
प्राचार्य डॉ एल बी पवार, पिंपळनेर