बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी हे आलिशान कारमधून पळाल्याचे समोर येत आहे. याविषयीचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आणत याप्रकरणात मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आरोपींना पळवण्यात कुणाचा हात आहे असा सवाल करण्यात येत आहे.
असा पाळाला वाल्मिक?
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपी सीआयडी ला शरण येण्या पूर्वी बीड वरून पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे..याविषयीचे पुष्टि देणारे तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्या मधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा होत आहे.
हे सुद्धा वाचा
अगोदर हॉटेलवर जेवण, मग गाडीत भरले डिझेल
बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे. तसेच याच आलेशन गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शक्यता आहे.
पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मीक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH23 BG 2231 जी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे. त्यांनी याप्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.
मोराळे म्हणाले काय?
प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कराड सीआयडी कार्यालयात येणार असल्याचे कळले. मी अगोदरच एका चौकात उभा होतो. त्यावेळी कराड यांनी आपल्याला सीआयडी कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले म्हणून त्यांना घेऊन गेलो, असे या कारचे मालक शिवलंग मोराळे हे म्हणाले. त्याची स्कॉर्पिओ कार सतत या प्रकरणात चर्चेला येत आहे. तर आता वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींना पळून जाण्यात कोणी मदत केली त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना सह आरोपी करण्याची मागणी होत आहे.
कृष्णा आंधळेंची माहिती द्या, बक्षीस मिळवा
संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपी कृष्णा आंधळे विषयीचे प्रसिध्दी पत्रक जारी करण्यात आले आहे. आरोपीचा पत्ता सांगणार्यास योग्य बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडून बक्षीस जाहीर जाहीर करण्यात आले आहे. आरोपीचा पत्ता सांगणार्याचे नाव देखील गुप्त ठेवणार आहेत. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा खून केल्यानंतर कृष्णा आंधळे फरार झाला होता.