पोलिस निरीक्षकांनी घेतली पोलिसांची "कायद्याची परीक्षा':नवे फौजदारी कायद्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांचा अनोखा उपक्रम

3 hours ago 1
देशभरात १ जुलैपासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस, वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. सात महिन्यात आपल्या पोलिस ठाण्यातील पोलिसांना कितपत हा कायदा कळला, यावर खदान पोलिसांची एक परीक्षाच घेण्यात आली. त्यात १० पोलिस अंमलदार अव्वल आले आहेत. तर उर्वरित पास झाले आहेत. हा अनोखा उपक्रम खदानचे पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांनी ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका काढली होती. हा पेपर सोडवण्यासाठी पोलिसांना ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या परिक्षेत ६५ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. परीक्षा संपल्यानंतर लगेच निकालही घोषित केला. त्यात प्रथम तीन येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बक्षीसही दिली. तर १० पोलिस कर्मचाऱ्यांनी अव्वल गुण मिळवले. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांनी हा उपक्रम राबवला. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सुभाष कैथवास यांनी पटकावला पहिला क्रमांक ५० गुणांच्या परीक्षेत पोलिस अंमलदार सुभाष कैथवास यांनी ४१ गुण घेऊन पहिले आले. तर दुसरा क्रमांक शंकर डाबेराव (गुण४०), तृतीय क्रमांक निलेश तिरपुडे (गुण ३८), नीलेश खंडारे (गुण ३७), आकाश राठोड व काळुराम पवार (गुण ३६), संतोष शिरल्लू (गुण ३५), अरुण शेगोकार (गुण ३४), अमित दुबे व अरविंद राठोड (गुण ३३) हे पोलिस कर्मचारी पहिल्या दहामध्ये आले आहेत. नवीन कायदे पोलिसांनी आत्मसात केले ^अचानक कायदे बदलल्याने आणि इतकी वर्षे जुन्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करत आल्याने सुरुवातीला अवघड गेले. मात्र आता त्यात चांगल्या प्रकारे सुधारणा होत आहेत. प्रत्येकाने शक्य तेवढ्या लवकर नवीन कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे हा या मागचा उद्देश होता. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्साहात परीक्षा दिली. वरिष्ठांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवला. - मनोज केदारे, ठाणेदार खदान पोलिस ठाणे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article