प्रत्येक श्वास बनतो आहे जात, धर्म,निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही:कवितांतून वर्तमान व्यवस्थेवर हल्ला बोल अन् गरिबीचे वास्तव
2 hours ago
2
रस्त्यावरती आणली त्यांनी आरती आणि नमाज.. देवाला देव्हाऱ्याचे स्वातंत्र्य उरले नाही... प्रत्येक श्वास बनतो आहे जात आणि धर्म.. निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही..., छत्रपती संभाजीनगर येथील विद्रोही कवयित्री डॉ. प्रा. प्रतिभा अहिरे यांच्या अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी मराठी, हिंदी, उर्दू त्रैभाषिक कविसंमेलनात देशाच्या वर्तमान व्यवस्थेवर हल्ला बोल केला, तर आर्थिक विषमता आणि गरिबीचे रखरखीत दाहक वास्तवही उभे केले. निमित्त होते लोकशाही उत्सव समितीच्या वतीने रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीच्या सभागृहात निमंत्रित कविंच्या कविसंमेलनाचे. लोकशाही उत्सव समितीच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २५ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन केले होते. या कविसंमेलनात देशाच्या सद्य स्थितीसह मानवी भावभावनांचे प्रतिबिंब उमटले.डॉ. कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. सुरूर यांनी आओ हिंदुस्तान बनाये ऐसा हिंदुस्तान प्यार का हो कानून जहॉं और सबका हो सन्मान... इन्सानो में फैल रहा है नफरत का आजार दिन धर्म में बाँट रहे हो उलफत का संसार.. दिल का शीशा टूट गया तो रोयेगा भगवान ही कविता सादर केली. छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे यांनी आर्थिक विषमता आणि गरिबीचे रखरखीत दाहक वास्तव उभं केलं... "लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं ताळेबंद तिजोरीत.. म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी... ती भाकर पाऱ्यासारखी निसटत राहिली, मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता.... या कवितेला उपस्थितांनी मोठी दाद दिली. ज्येष्ठ शायर बिलाल अहेमदनगरी यांनी युवकांच्या विसंगतीवर मार्मिक शब्दांत भाष्य केले व काही प्रेमावरील शेर पेश केले. "मतला मेरी गझल का सुनया गया मुझे एक शायरे मिजाज बनाया गया मुझे.. मायूस तो नही हुं नमकीने जिंदगी से हर गम को सह रहा हूं अपनी हंसी खुशी से.... प्रास्तविक अशोक सब्बन यांनी, तर सुत्रसंचालन डॉ महेबुब सय्यद यांनी, तर आभार सोनाली देवढे-शिंदे यांनी मानले. यावेळी कॉम्रेड स्मिता पानसरे, अॅड. बन्सी सातपुते, चित्रकार राजानंद सुरडकर, अॅड. रवींद्र शितोळे, प्राचार्य जयदीप पवार, आनंद पुरंदरे, आबेदखान दुलेखान, संध्या मेंढे, अॅड.विद्या जाधव -शिंदे आदी उपस्थित होते. प्रेम कवितांना मोठी दाद आझमगड येथील शायर मुसेब आझमी यांनी प्रेम भावनेचे रंग भरले.. "आखिरत इंसाफ आशिक का करेगी जब पहेले मजनू से बुलाया जाएगा मुझको...हमसे जिंदा है जहाँ में उलफत..तुझको दुनिया बताए कैसे..? हैरगी,ऑंख जो दिल के केंद्र... उसको पानी से बुझाए कैसे...?" या तरलतम भावनेच्या कवितेलाही रसिकांनी दाद दिली. गोरखपूर येथील शायर नोमान सिद्दिकी यांनी याच आशयाला विस्तारत आपली गझल सादर केली.. "कुछ दिनों से है सुरज कही लापता चांद भी अपने घर से निकलता नही... सिर्फ बातो से अब दिल बहलता नही एक चिंगारी तो लाजमीं है हुजूर कोई दीपक यहॉं खुद जलता नहीं....."या प्रेम कवितेलाही मोठी दाद मिळाली..
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)