मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाली.Pudhari News Network
Published on
:
02 Feb 2025, 5:43 am
Updated on
:
02 Feb 2025, 5:43 am
सुरगाणा : वणी -बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवारी (दि.2) पहाटे चार ते साडेचार वाजे दरम्यान महाराष्ट्र मधून गुजरात राज्यात जाणारी खासगी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने (युपी 92 एटी 0364) पलटी होऊन पाच प्रवासी मृत्यूमुखी झाले असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत.
सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाल्याने यामध्ये रतनलाल देविराम जातव (41), बोलाराम पोसाराम कुसवा (55), गुहीबेन राजेशभाई यादव (60), बिजेंद्र बादल यादव (55), कमलेश भाई यादव (60, सर्व राहणार मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. बसमधील जखमी 21 प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी 24 यांना अहावा येथे दाखल करण्यात आले आहे.