मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) कार्यकारी मंडळाच्या सदस्या ऋजुता जगताप म्हणाल्या, महिला उद्योजिकांसाठी आम्ही काम करतो तेव्हा पाहतो की, महिलांना उद्योगासाठी निधी मिळत नाही. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पहिल्यांदाच उद्योग क्षेत्रात पदार्पण करणार्या अनुसूचित जाती आणि जमातीतील महिला उद्योजिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
ती खूप फायदेशीर ठरणार आहे. महिलांना कर्ज मिळणार असल्याने अनेक महिला उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवतील, महिलांची संख्या उद्योग क्षेत्रात वाढेल आणि महिलांमध्ये उद्योगासाठीचा आत्मविश्वास वाढेल. अर्थसंकल्पात महिला उद्योजिकांच्या स्टार्टअपना चालना देण्यावर दिला आहे. पण, ज्या योजना घोषित करण्यात आल्या आहेत, त्या कागदोपत्री मर्यादित राहू नयेत, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, तेव्हाच महिला उद्योजिकांना त्याचा लाभ होऊ शकेल.
अनुसूचित जाती आणि जमातीतील महिला उद्योजिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण, ही योजना महिलांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याची योग्यरीत्या अंमलबजावणी होणेही आवश्यक आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांची माहिती महिला उद्योजिकांपर्यंत पोचविण्यासह त्याची ठोस अंमलबजावणीही होणे महत्त्वाचे आहे.
- रेश्मा मुल्ला, महिला उद्योजिका